प्रणव मुखर्जींनी संघाला भेटावे, हिंदू असणे म्हणजे काय त्याचे धडे द्यावे!
संघासोबत संवाद साधण्यात वाईट काही नाही. खरं तर हे आहे की, पुरेसे लोक त्यांच्याशी संवादच करत नाहीत. मुखर्जींसारख्या अनेकांना त्यांनी बोलवावं आणि त्यांनी जावं, ही माझी इच्छा आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या माहितीचं वर्तुळ भेदून काही नवीन माहिती तरी त्यांच्यापर्यंत पोहचेल. त्यांना कळेल की, ते कोण आहेत आणि या देशात काय बिघडलं आहे.......